- बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार वर-वधू अनं साक्षीदारांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- वयाचा खोटा दाखला तयार केला. तो खरा असल्याचा आरोपीने भासवले. आळंदी देवाची येथील सूत्रबंधन सामाजिक संस्थेत आरोपीने (दि. १३/०१/२०२३) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अल्पवयीन १९ वर्षीय मुलीसोबत बालविवाह केला.
विवाह साक्षीदार तिघांनी बालविवाहास हजर राहून बालविवाहास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी फिर्यादी सहाय्यक बाल विवाह प्रतिबंध अधिकारी, न्यू पनवेल, रायगड यांनी वधू (वय १९ वर्षे, रा. हनुमान नगर महापे गाव मिलेनियम बिझनेस पार्क, तुर्भे, नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसी, नवी मुंबई), वर सौरव रणधीर मखरे (वय १९ वर्ष, रा. वरीलप्रमाणे), विवाह साक्षीदार अक्षय सुनील साबळे (वय २५ वर्ष), सोमनाथ नाथा उघडे (वय २५ वर्ष), आकाश दादाराव नागदिवे (वय २४ वर्ष) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी आरोपींविरोधात ३४/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१. ३४, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००७ चे कलम १०, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००७ चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















