- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्यात घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- “ जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही ”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले “ लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला.
” दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विन जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो ”, असेही ते म्हणाले.
भाजपा नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, भाजपाने आज पुणे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.


















