न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ रामकृष्ण मोरे सभागृह येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास शत्रुघ्न काटे, श्रीमती विठाबाई विद्याधर चाबुकस्वार, वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल वसंत चाबुकस्वार, मॉडर्न कॉलेजच्या प्रा. वैशाली चाबुकस्वार, जेष्ठ नागरिक सुदामराव कापसे, आर. डी. भालेराव, ऍड. सीमा शर्मा, कुरुळी ग्रामपंचायत सदस्या प्रतिभाताई कांबळे, स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टचे देविदास तांबे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच याप्रसंगी न्यू सिटी प्राईड या शाळेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या मातोश्री श्रीमती विठाबाई विद्याधर चाबुकस्वार यांच्या जीवनावर आधारित असलेले ” विठाईचे भीमप्रेम-एका आईचा बुद्धमय प्रवास ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, महिला आघाडीच्या शोभाताई जगताप, युथगेम सचिव पुणे जिल्हा निवृत्ती काळभोर, सामाजिक कार्यकर्ते अरुण तांबे, राजू भालेराव, विशाल जाधव, राजन नायर, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, किरण लोंढे, तात्या शिनगारे आणि संकल्प पुष्पमालेचे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना चषक देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या लोककला सादर केल्या, तसेच पाचवी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी गौतम बुद्धंधांच्या जीवन चरित्रावर नाटक सादर केले व आपली कला सादर केली. आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी बुद्धकाळापासून मानवी जीवनात कसे बदल झाले व देशातील जनतेने बदल कसे धीराने स्वीकारले याची महती प्रा. वसंत चाबुकस्वार यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षका सुनंदा साळवी, निशा पवार, उर्मिला ठोंबरे, देवर्षी नंदी मॅडम यांनी केले व आभारप्रदर्शन सहशिक्षका प्रज्ञा शिरोडकर यांनी केले.