- स्वच्छ सर्वेक्षण आढावा बैठकीत आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आढावा बैठक स्थायी समिती सभागृहात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थिती घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, ज्ञानदेव जुंधारे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक सोनम देशमुख , क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, यांसह सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहा. आरोग्याधिकारी, सर्व आईसी सुपरवायजर, सुलभ टॉयलेट ठेकेदार, एजी/ बीव्हीजी – सुपरवायजर आदी उपस्थित होते.
सदर बैठकीत आयुक्त यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ च्या अनुषंगाने कचरा विलगीकरण, राडारोडा उचलणे, रस्तेसफाई सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छता देखभाल दुरूस्ती रंगरंगोटी,नालेसफाई, जलनिस्सारण विभागानी अनुषंगाने करावयाची कामे ,व्यावसायिक परिसर स्वच्छता, कचरा वाहतूक व्यवस्था सनियंत्रण साठी ICCC या कक्षात GPS द्वारे कचरा वाहतूक वाहने यांचे ट्रॅकिंग तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ च्या अनुषंगाने जनजागृती, सिटी प्रोफाइल नुसार करावयाची विविध कामे, याचा आढावा घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. समुदाय स्वच्छतागृह देखभालीसाठी नवी दिशा उपक्रम उपयुक्त ठरत असून जास्तीत जास्त याप्रमाणे देखभालीसाठी कामे नवी दिशा अंतर्गत महिला बचत गट याकडे सोपविण्यात यावीत व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ साठी झोननिहाय नेमलेल्या नोडल अधिकारी यांनी पुढील काळात जास्तीत जास्त क्षेत्रीय भेटी द्याव्यात अशा सूचना दिल्या. शहरात सध्याच्या स्थितीत ९८ पेक्षा जास्त ओला व सुका असे विलगीकरण करून कचरा प्राप्त होत असून ह्यात निश्चित चांगली कामगिरी दिसून येत आहे. त्याबाबत आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले. ज्या भागात कचरा विलगीकरण बाबत अडचणी असतील तेथे जनजागृती वाढवावी अशा सुचना दिल्या.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ च्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या अंतर झोन स्पर्धेत डिसेंबर महिन्यात प्रथम क्रमांक अ झोन ने पटकावला. द्वितीय क्रमांक ड झोन व तृतीय क्रमांक ह झोन ने प्राप्त केला. संबंधित झोनच्या टीमचे प्रतिनिधी म्हणून झोनल अधिकारी व सहायक अधिकारी यांचा मा आयुक्त श्री शेखर सिंह यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले .प्रथम क्रमांक पटकावलेले अ झोन क्षेत्रिय अधिकारी सौ. सुचिता पानसरे यांना मा. आयुक्त शेखर सिंह यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले. तसेच द्वितीय क्रमांकावर ड झोनचे क्षेत्रियअधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, तृतीय क्रमांकावर ह झोनचे क्षेत्रिय अधिकारी श्री. विजय थोरात यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविले.












