न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- क्रीडा विभागाचा गलथान कारभाराचा फटका क्रीडाप्रेमींना बसत आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील मैदानावरील अॅथलेटिक्सचा सिथेटिक ट्रॅक बदलण्यात येणार आहे. त्यासाठी संकुल तब्बल तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर येथे चारशे मीटर अंतराचा सिथेटिकच्या ट्रॅक तयार केला आहे. तिथे ट्रॅकवरून धावण्याचा सराव होतो. मैदानात लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, बांबू उडी, थाळी फेक, गोळा फेक, हातोडा फेक या क्रीडा प्रकाराचा सराव केला जातो. सकाळ व संध्याकाळी अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी येथे नियमितपणे सराव करतात.
क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागात समन्वयाचा अभाव आहे. सिथेटिक ट्रॅकला १० वर्ष जुना झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खराब झाला आहे. खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचले. मैदानात मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने गैरसोय होते. सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्रीडा विभागाने खराब झालेला सिथेटिक ट्रॅक काढून नवीन ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्या दुरुस्ती कामासाठी किमान तीन महिने मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत खेळाडू. प्रशिक्षक व पालकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. क्रीडा विभागाचा गलथान कारभाराचा फटका क्रीडाप्रेमींना बसत आहे.
क्रीडा स्थापत्य विभागाकडून या मैदानावर दुरुस्ती काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान तीन महिने मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुकिंग बंद केले आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करून ते खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका..












