न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- नव व्यावसायिकांना आणि स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ घे भरारी ‘ ने भव्य प्रदर्शन प्रथमच आकुर्डीतील seasons banquet येथे दि. ३,४,५ फेबुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित फटांगरे आणि आपला आवाजच्या संगीता तरडे यांच्या हस्ते झाले.
करोनाच्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना खूपच आर्थिक फटका बसला आहे. त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यासपीठ मिळावे यासाठी ‘ घे भरारी ‘ हा ग्रुप प्रयत्नशील असतो. ह्या प्रदर्शनात ६० पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे. उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफुम्स, कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कालाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या, टेराकोटा वस्तू, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे भरपूर शाकाहारी गरमागरम पदार्थांची पर्वणी येथे असणार आहे. एक उत्कृष्ट वीकेंड घालवण्यासाठी आकुर्डी व शहरातील नागरिकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही.
अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या घे भरारीच्या साथीने झालेला प्रवास येथे बघता येईल. तेव्हा हे प्रदर्शन चुकवू नये असे अमित फतांगरे यांनी सांगितले.
या सर्व छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी असे संगीता तरडे यावेळी आवर्जून म्हणाल्या.
सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.












