- जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांचा लवाजमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी मंगळवार ७ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे, तर या पोटनिवडणुकीसाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून तब्बल २ हजार ४४८ कर्मचारी लागणार आहेत.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर, २०२२ पासून राबविण्यात आला. यानुसार, ५ जानेवारी, २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, २०५ – चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी, याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ने वाढ झाली आहे.
अंतिम मतदार यादीतील मतदार संख्येच्या आधारे २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.












