- पिंपरी पोलिसांकडून १८ वर्षीय तरुणाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- आईसोबत फिर्यादी महिला बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादीना पाहून त्यांच्याकडे हसून डोळ्यांनी व हाताने अश्लिल इशारा केला. फिर्यादीने पतीला घडला प्रकार कळवला. फिर्यादीचे पती आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपीने त्याचा मोठा भाऊ व इतर पाच ते सहा जणांना बोलावुन घेतले. त्या सर्वांनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर देखील आरोपीने फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३) रोजी रात्री ९.४५ वा. ए.जे चेम्बर्स सोसायटीसमोर, खराळवाडी, पिंपरी येथे घडली. २७ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी उमेर समिर तांबोळी (वय १८ वर्षे), साद समिर तांबाळी (वय १९ वर्ष, दोघे रा. खराळआई मंदीराजवळ, खराळवाडी, पिंपरी), व त्यांचे इतर पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींविरोधात १५८/२०२३ भा.द.वि कलम ३५४५, ३५४४, १४३, १४७, १४९,३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.












