- दोन पिडीत महिलांची सुटका; लॉज मॅनेजर अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- निगडीतील दुर्गानगर चौकातील न्यू विसावा लॉज येथील रूम नंबर १०४ मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती निगडी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळाली. पोलिसांनी (दि. ३) रोजी रात्री ७.०० वा. सुमारास घटना स्थळी कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. दोन पिडीत महिलांची सुटका केली.
या महिलांना आरोपी वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडुन त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित होते. तसेच वर्दळीच्या ५० मीटर अंतरावर संजिवनी मल्टीस्पेशालीटी रुग्णालय असताना देखील आरोपींनी वेश्या व्यवसाय सुरुच ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून एक मोबाईल, रोख रक्कम, कंडोम पाकीट असे एकुण ११,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लॉज मॅनेजर लहु श्रीराम ऐडके (वय २८ वर्षे रा. न्यु विसावा लॉज, दुर्गामाता चौक, सीएनजी पेट्रोलपंपा जवळ, निगडी, मुळ पत्ता मु. भंडारवाडी, जि. उस्मानाबाद), पाहिजे आरोपी जितेश रमेश कुंदर (वय ४७ वर्षे, रा. मुनलाईट लॉज, दुर्गानगर, निगडी), लॉजचालक जयप्रकाश शेट्टी (पुर्ण नाव माहित नाही, वय ४० वर्षे रा. मुंबई) यांच्यावर ८८/२०२३ भादवि कलम ३७०, (३) ३४,सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.












