- सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोधवर अजित पवारांचे महत्वाचे भाष्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे कारण नाही. लोकशाही आहे, असे अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही, म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे, त्यांना निवडून देईल,” असे अजित पवार म्हणाले आहेत.












