न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- hi you are my lucky charm when I see you get good news thank you असा फिर्यादी महिलेस आरोपीने मॅसेज केला. त्यानंतर पुन्हा Hi hows day one small request arly morning wants to see you मॅसेज करुन त्रास दिला. त्यानंतर पुन्हा Happy new year असे वारंवार मॅसेज करुन फिर्यादीचा पाठलाग केला.
फिर्यादी गॅलरीत केस विंचरत उभी असतांना आरोपीने त्याच्या गॅलरीत बसुन फिर्यादीकडे पाहुन अश्लिल कृत्य करीत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादीचा विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार मागील ६ महीन्यापासुन ते दि. २ पर्यंत सकाळी ११.०० वाजता दरम्यान वेळोवेळी सोपानबाग कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवडेनगर यथे घडला.
२९ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी गजानन कुशाबा राठोड (वय ४० वर्षे, धंदा- व्यवसाय, रा. स.नं.३८,३९ सोपानबाग कॉलनी, चिंचवडेनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी विरोधात ६१/२०२३ भा.द.वि. कलम ३५४(अ), ३५४ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.


















