न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- ‘ तुझी पत्नी सारखी बाहेर बसते ‘ सासूने सुनेची घरी आल्यावर मुलाकडे तक्रार केली. त्यावरून आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहण केली. लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या डोळयाच्या भुवईवर मारुन त्यांना जखमी केले. तसेच ‘ तु माझ्या घरातुन निघुन जा; नाहीतर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तांबे चाळ, रामनगर, रहाटणी येथे घडला.
फिर्यादी महिलेने आरोपी लक्ष्मण तात्याराव अंधारे (वय २७ वर्षे, रहाटणी, मुळगाव लातूर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी पती विरोधात ११३/२०२३ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















