न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- काळेवाडीकडुन डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कावेरीनगर अंडरपास रस्त्याच्या डाव्या बाजुने फिर्यादी दुचाकी चालक (एम.एच.१४ एच. व्ही. २२९३) मित्रासह जात होते. त्यावेळी पॅसेंजर रिक्षाच्या चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करून रिक्षा अचानक डाव्या बाजुस घेतली. दरम्यान दुचाकीच्या पुढील चाकाला रिक्षाचा धक्का बसला.
फिर्यादी व मित्र दुचाकीसह रस्त्यावर पडले. अपघातात फिर्यादीच्या डोक्यास मार लागून कानातून रक्त येऊन फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांचा मित्र अमोल याच्या उजव्या हातास, पायाच्या पंजास खरचटले व गाडीचे किरकोळ नुकसान झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.५) रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास घडला.
फिर्यादी गणेश ज्ञानेश्वर माळी (वय ३० वर्षे, धंदा-नोकरी, रा. साई संकुल अपार्टमेंट, धनगरबाबा मंदीर समोर, भीगवन हॉटेल शेजारी, रहाटणी) यांनी आरोपी अज्ञात पॅसेंजर रिक्षावरील चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ११५ / २०२३ भा.दं.वि. कलम २७९, ३३७,४२७ मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















