- जाब विचारणाऱ्या पतीलाही मारहाण; दोघेजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- पतीला शोधण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने ‘ ए इधर आना, सुन ना, मेरे साथ चलती क्या ‘ असे बोलून फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून त्यांची छेड काढली. त्यावेळी फिर्यादीचे पती घटनास्थळी आले असता आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली. फिर्यादीने पोलीसांना फोन करण्यासाठी फोन काढला असता फिर्यादीच्या हातातुन फोन हिसकावून घेवून तो आरोपीने रस्त्यावर आपटला. आरोपीने सह आरोपी २ याला फोन करुन बोलावुन घेतले. सह आरोपी २ याने फिर्यादीस “तु मुझे जानती है क्या, में इधर का गाववाला हु, तु क्या करेगी” असे बोलून अश्लिल शिवीगाळ करून फिर्यादीच्या पोटावर लाथ मारली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ६) रोजी रात्री १:३० वा. चे सुमारास मुकाई चौक, ईडन गार्डन सोसायटीकडे जाणा-या कच्या रस्त्यावर आदर्शनगर, किवळे येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी अमित गजानन वानरे (वय ३२ वर्षे रा. सर्वे नं. ७३ शिवशंभो कॉलनी आदर्शनगर किवळे), सुलतान युसुफ खान (वय २७ वर्षे रा. पंडीत चाळ, शिवाजी विदयालयामागे, गांधीनगर, देहुरोड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी ९७/२०२३ भा.द.वि. कलम ३५४, ३५४ (४). ४२७, ३२३, ५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे.


















