न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- सोसायटीमध्ये वॉचमन म्हणुन काम करणाऱ्या आरोपीने फिर्यादी त्यांच्या भावासोबत घरी असताना महिला फिर्यादीचा डावा हात पकडला. “ आम्ही काय कमी पडलो होतो, तेव्हा तुझ्या भावाला बोलाविले ” असे म्हणुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर आरोपीने आरडा ओरडा करुन सोसायटीमधील ३० ते ४० लोकांना जमा केले. त्यावरून सर्व लोकांनी फिर्यादीशी हुज्जत घालुन भांडण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २) रोजी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरी निमेष हाउसिंग सोसायटी, अजमेरा रोड, मोरवाडी, पिंपरी येथे घडला.
१७ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी उमेश (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) व सोसायटीतील ३० ते ४० जण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींविरोधात १६५/२०२३, भा.दं.वि. कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ पोक्सो, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


















