न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- अल्पवयीन असल्याचे माहीत असुनदेखील आरोपीने १७ वर्षीय फिर्यादी मुलीचे फोटो स्वत:च्या इंस्टाग्राम अंकाउटवर अपलोड केले. इंस्टाग्राम अंकाउटवरील फोटोमध्ये इंग्रजीत | Love you तसेच शेजारी बदामचे चिन्ह लिहून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीच्या वाढदिवसाचे अनेक फोटो फिर्यादीच्या नकळत इंस्टाग्राम अंकाउटवर अपलोड केले. आरोपीने फिर्यादीच्या चुलत बहिणीच्या इंस्टाग्राम अंकाउटवर फिर्यादीला ‘फोन करायला सांग’ असा मेसेज पाठवला. फिर्यादीच्या चुलत बहिणीने फिर्यादीला घरी येवुन हा प्रकार सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली, असे या फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ८) रोजी १२.३० वाजेच्या सुमारास शिरगाव, मावळ येथे घडली.
फिर्यादी १७ वर्षीय मुलीने आरोपी अमोल भोसुरे (धानोरी, ता. शिरूर, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलीसांनी ३६ / २०२३ भादवी कलम ३५४(४) लैंगिक अपराध बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (४), १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















