न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- ऑनलाईन माध्यमातुन आरोपींनी फिर्यादीला व्यवसायाचे अमिष दाखवले. फिर्यादीला मेडीकल सॅम्पल पाठवून ऑनलाईन ग्राहकाचे नाव देवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मेडीसीनकरिता ऑर्डर देवून ६,५७,२०० रुपये फिर्यादीकडून ऑनलाईन घेतले. ऑर्डर व मेडीसीन न देता फिर्यादीची डिलरशिप रद्द केली. आरोपींनी स्वतःचे मोबाईल नबंर बंद केले. फिर्यादीला ऑर्डर व मेडीसीन न देता फिर्यादीची एकुण ६,५७,२०० रुपयांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २/११/२०२२ ते दि. २७/१२/२०२२) दरम्यान फिर्यादीच्या घरी घडला.
फिर्यादी कपिल प्रमोद भारंबे (वय २७ वर्षे, धंदा. नोकरी, रा. स्पेक्टरम हॉस्टेल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी- चिंचवड, मुळगाव प्लॉट नं. ३३, अयोध्यानगर, गणपती मंदिराजवळ, जळगाव) यांनी आरोपी श्रीन नेचरवेल कंपनी, विजयनगर सी २१, मॉलजवळ, इंदौर, मध्यप्रदेश, कस्टमर प्रविण चंदानी (रा. महाराणा प्रतापरोड, मानेकनगर, जुनी पनवेल) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ६८ / २०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम- ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















