न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ० ते ५ वर्ष वयाच्या लहान मुलांचे नियमीत लसीकरण स्वीकृत नगरसेवक दिनेश लालचंद यादव यांच्या कुदळवाडीतील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील लहान मुलांचे लसीकरण करण्यात आले. दिनेश यादव यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील उपाययोजनांबाबत पाहणी केली. तसेच उपस्थित लाभार्थी नागरिकांसोबत संवाद साधला..


















