न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- पुणे-आळंदी रस्त्यावरील देहुफाटा, आळंदी परिसरातील आशियाना लॉज येथील पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती दिघी पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षास मिळाली. २०० मिटरच्या परिसरात नेत्रज्योती हॉस्पीटल, स्किन क्लिनिक तसेच ब्लिस डेंटल केअर दातांचा दवाखाना अशी सार्वजनिक रुग्णालये असतानादेखील आरोपींनी वेश्याव्यवसाय चालवला.
पोलिसांनी (दि. ८) रोजी सायंकाळी ६.०० वाजता लॉजमधील रुम नं १०५ मध्ये छापा मारला. दोघांना ताब्यात घेतले. तसेच एका महिलेची सुटका केली.
शिवनाथ बाबासाहेब रहाणे (वय २६ वर्षे रा. घरनं- २७७/५ महाव्दार चौक, आळंदी, मुळ पत्ता डोराळे ता. रहाता जि. अहमदनगर), लॉज मालक प्रशांत राम जगताप (वय ३२ वर्षे रा. माऊली पार्क, मरकळ रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिघी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ६०/२०२३ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












