- पिंपरी, चिंचवड, चिखली, अजमेरा येथील गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- धारदार हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणा-या टोळीला गुन्हे शाखा युनिट २ ने अटक केली आहे. दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कु-हाड, तलवार अशा धारदार शस्त्राचा धाक दाखवून सहा अनोळखी आरोपींनी दोन मोटर सायकलवरुन येवून पिपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पिपरी १६६ / २०२३. भा.द.वि.कलम ३९२, १०४, भारतीय हत्यार (कायदा कलम ४ (२५), महा.पो.का.क. ३७ (१) १३५ सह कि.ला. अमॅडमेर १७३२ चे कलम ३३७, चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६४ / २०२३ भादवि कलम ३९०३४, चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८८/ २०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे दिनांक ०६/०२/२०२३ रोजी २१/३० चाचे सुमा रूपेश्वर सुपर मार्केट महालक्ष्मी कॉम्पलेक्स हरगृहे वस्ती नेवाळे वस्ती चिखली येथील दुकानांतील कॅश काऊण्टरच्या ड्रॉवरमधुन रोख रक्कम रुपये पाच हजार रुपये जबरदस्तीने हत्यारांचा धाक दाखवून काढून घेतले. रात्री ११.१५ च्या सुमारास हिटलर क्रॉस चायनिज हॉटेल मासुळकर बस स्टॉप समोर अजमेरा पिपरी येथे हातामध्ये कोयता, कु-हाड व तलवार घेवून हॉटेलमध्ये कामगारांना शिवीगाळ, धमकी दहशत निर्माण करुन ड्रॉवर मधुन १५०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. रात्री ११.५० च्या सुमारास चिंचवड एस्पायर इस्टेट बेल्जीएम वॉफल्स कंपनीच्या स्टोअरमध्ये हातात तलवारी व हत्यारे घेवून दहशत माजवून ३००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
एका पाठोपाठ एक गुन्हे करून दहशत माजविल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. गुन्हे शाखा युनिट २ चे रात्रगस्त अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश नांदुरकर याना माहीती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या मिळालेल्या वर्णनावरून शोध सुरु केला. घटनेतील आरोपी एकच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी गुन्हयात सहभाग असलेला आरोपी आणि दोन अल्पवयीन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले. त्यांनी व त्यांच्या इतर तीन साथीदारासह गुन्हे केल्याचे कबुल केले.
सदरची कारवाई पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रभात अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश जादूरकर व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.












