न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील तुकाराम महाराज पुतळयाजवळील सार्वजनिक रस्त्यावरून (दि. १०) पहाटे ४.३० वाजता फिर्यादी पायी घरी जात होते. दरम्यान दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला रस्त्यात अडवले.
त्यांच्या गळ्यावर सत्तुर लावुन दमदाटी केली. त्यांच्याकडील वीस हजारांचा व्हीओ व्ही. २३ प्रो. या कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट घेऊन पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी रमजान रज्जाक शेख (वय २३ वर्ष धंदा नोकरी, रा. सेक्टर १०. प्लॉट नं. १०० अन्वीशा शुगर कंपनी, भोसरी एमआयडीसी, मुळगांव मु.पो. कुसुर ता. दक्षिण सोलापुर, जि. सोलापुर) यांनी आरोपी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी १७५/२०२३ मा. द. वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












