न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- पती घरामध्ये नसताना आरोपी व दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवून फिर्यादीचे पती आल्याचे भासवले. फिर्यादीच्या घरामध्ये घुसून त्यांचे तोंड दाबले.
त्यांना जमिनीवर पाडून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गलिच्छ कृत्य केले. तसेच फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता आरोपींनी फिर्यादीला धक्काबुक्की करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी मध्यरात्री ०१.३० च्या सुमारास आळंदीत घडली. फिर्यादी महिला यांनी आरोपी जगदिश काकडे व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी तिघांच्या विरोधात ४२/२०२३ भादवी कलम ३५४अ, ३५४ब, ४५२, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


















