न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- हात उसणे दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने चिडुन जावून फिर्यादीला शिवीगाळ केली. हातामधील काचेची दारूची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
हा प्रकार (दि. ९) रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराजवळ गव्हाणे वस्ती, गणपती मंदिराजवळ, भोसरी येथे घडला.
फिर्यादी मोहनसिंग पहाडसिंग ठाकुर (वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. भोसरी. मुळगाव बरबटा पोलीस स्टेशन, कटान्गी, तालुका पाटण, जिल्हा जबलपुर, मध्य प्रदेश) यांनी आरोपी खेमसिंग ठाकुर ( रा. सदर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात १३४/२०२३ भादवी कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















