न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- दापोडीतील सीएमई गेटसमोरील भोंडवे चाळ येथे पन्नास हजार रुपये किमतीची टिव्हीएस कंपनीची अॅटो रिक्षा (एमएच१२एचसी४९९६) फिर्यादीने लॉक लावुन पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे.
हा प्रकार (दि. ८) रात्री ८.३० वा ते (दि. ९) सकाळी ८:३० च्या दरम्यान घडला. फिर्यादी किरण राजेंद्र कोथंबिरे (वय ३५ वर्ष, धंदा-रिक्षाचालक, रा. दापोडी) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी १३३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















