न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- भरधाव वेगात टाटा कंपनीचा टँकर (एमएच१३डीक्यू २१००) चालवून आरोपीने कंपनीत कामाला निघालेल्या होंडा अक्टीवा (एमएच१९डीडी९३५३) दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. दुचाकीचालक फिर्यादीचा मित्र संतोश दादाराव सुरवाडे (वय ३३ वर्षे) यांचा अपघात केला. तसेच त्यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरला.
हा अपघात (दि. १०) रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान तळेगाव दाभाडे ते चाकण डांबरी रोडवर, सुदवडी गावच्या हद्दीत घडला.
फिर्यादी रवीकिरण रामाकृष्णा पोटु (वय ३५ वर्षे व्यवसाय नोकरी, सध्या रा. मायहोम सोसायटी, फ्लॅट नं. बी-४०८, मनोहरनगर तळेगाव दाभाडे) यांनी आरोपी- रामनारायण रतन यादव (रा. साईश्रध्दानगर, टाटा पॉवर हाऊस जवळ विसवली, कल्याण पुर्व ता. कल्याण जि-ठाणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ४३ / २०२३ भा.द.वि. कलम २७९, ३०४ अ, मो.वा.का. कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















