न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- निवडणुक खर्च संनियंत्रण लेख्यांची तपासणी अंतर्गत उमेदवाराने ठेवलेली दैनंदिन खर्च विषयक तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक निवडणूक विभागाने जाहीर केले आहे.
पहिली तपासणी (दि. १५) सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत तर दुसरी तपासणी (दि. २०) रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० तर तिसरी तपासणी (दि. २४) सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत होणार आहे.
थेरगाव ग” क्षेत्रीय कार्यालय, ३ रा मजला येथील २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही तपासणी होणार आहे.
















