न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- बिल्डींगच्या खाली खेळत मुलगी असताना फिर्यादीच्या सोसायटीतील बिल्डींगमध्ये राहणारा आरोपी हा फिर्यादीच्या मुलीजवळ आला. ‘तुझा टी शर्ट खुप छान आहे’, असे म्हणत फिर्यादीच्या मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईन, असे वर्तन करुन आरोपीने तिचा विनयभंग केला आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी रात्री ८.३० ते ९.०० वाजेच्या सुमारास बिंदु सोसायटी, सी विंग, थरमॅक्स चौक, सुर्या इलेक्ट्रीक शोरुम समोर, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी तानाजी रंगनाथ भोर (वय ६७ वर्षे, रा. थरमॅक्स चौक, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ९६/२०२३ भा.दं.वि कलम ३५४ पोक्सो २०१२ कलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.