न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- कपडयाची पिशवी देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला आरोपींनी गोडवूनमध्ये नेले. आरोपी आत्याच्या मुलीच्या नवऱ्याने फिर्यादीला ‘तु माझ्या व पत्नीच्या मध्ये का येतो? आम्ही आमचे पाहुन घेवु’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. लाकडी बांबुने पाठीला मारुन दुखपत केली. तसेच आरोपीच्या भावाने गोडावूनमध्ये पडलेल्या पिवीसी पाईपच्या तुकडयाने फिर्यादीच्या दोन्ही पायाच्या मांडीवर व पोटरीवर मारुन दुखापत केली. त्यावेळी आरोपी फिर्यादीला त्यांचा मेव्हणा शोयेब चौधरी याला येथे बोलावुन घे, असे म्हणाला. त्यास बोलविणार नाही असे म्हणताच दोन्ही आरोपींनी चिडुन जावुन फिर्यादीस मारहाण करून तु जर बोलविले नाहीतर तूला सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास पवार वस्ती, चिखली येथील सितारा स्टील, कुदळवाडी येथे घडला. फिर्यादी मोहम्मद अनस चौधरी (वय २० वर्ष, धंदा-नोकरी, रा. साईराज बिल्डींग, आर एच ९६/६, प्लॅट नंबर, शाहुनगर, चिंचवड) यांनी आरोपी आरशद अकबरअली खान (वय ३० वर्ष, रा. कल्पतरु अर्पाटमेन्ट, प्लॅट नंबर-५, पुर्णानगर चिंचवड), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी दोघांच्या विरोधात ९५/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.