न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त रविकरण घोडके, वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, तसेच विविध विभागातील सिताराम राठोड, अविनाश राठोड, रमेश राठोड, संजय जाधव, रवि राठोड, दिलीप आडे,माया वाकडे आदी उपस्थित होते.












