- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जयंतीनिमित उन्नतीच्या विठाई ग्रंथालयात अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- समाजातील दिनदुबळ्यांचा कैवारी आणि निराधारांचा आधार बनून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ हे समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले. आजाराने कवटाळलेले असताना मनात हार न मानता सामाजाचे ऋण फेडण्याची त्यांची जिद्द आणि धडपड राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या विचाराचा आणि कर्तृत्वाचा वारसा जपण्याचे काम आम्ही शेवटपर्यंत करत राहू, असा विश्वास उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनच्या विठाई ग्रंथालयात भाऊंच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, समाजसेवक जयनाथ काटे, गजानन काटे, मधुकर पाटील, महेश गवस, अनिकेत फुरंगे, सखाराम ढाकणे, प्रा. दिनेश शाह, भारती कटकधोंड, एन. के पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी एक हजार झाडांचे वाटप करण्यात आले.
सौ. कुंदाताई म्हणाल्या, राजकारण करताना भाऊंनी कोणावरही अन्याय होईल अशी भूमिका कधी घेतली नाही. प्रमुख नेत्यांबरोबरच तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला देखील त्यांनी ताकद देऊन काम करण्याची संधी दिली. राजकारण करत असताना सामाजिक कार्यावर भर कसा द्यायचा याची शिकवण त्यांनी सर्वांना दिली. त्याचा आधार घेऊन आम्ही उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसेवा करत आलो. उन्नतीची सेवा पाहून भाऊंनी अनेकवेळा कौतुक केले. त्यामुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली. आज भाऊ या जगात नसले तरी त्यांच्या विचारांचा आणि राजकीय संस्काराचा प्रभाव आमच्यावर नक्कीच आहे. समाजकार्य असो अथवा राजकीय कार्य भाऊंचे विचार सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे ही कुंदाताई म्हणाल्या.
शुत्रुघ्न काटे म्हणाले, राजकारण आणि समाजकार्याची जोड देऊन भाऊंनी आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते घडवले. त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर पदापासून ते स्थायी समिती सभापती, सदस्य अशा महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. केवळ एवढेच नाही, तर भाऊंनी आपल्या पिंपळे सौदागरमधील विकासावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माध्यमातून विविध प्रकल्प, विविध योजना याठिकाणी राबविण्यात आल्या. एक नगरसेवक म्हणून समस्या घेऊन गेल्यानंतर ती सोडविण्यासाठी भाऊंनी प्राधान्य दिले. त्यामुळे आज पिंपळे सौदागर भागाचा विकास करता आला.












