- पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी वर्तविले भकित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक आणि माध्यमिक सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह उपस्थितीत होते. या कार्यशाळेसाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणात हजर होते.
यावेळी उपआयुक्त संदीप खोत ,प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, क्यू.सी.आय. (विद्यार्थी शिक्षा मुल्यांकन) या संस्थेचे मधु अहलुवालिया व अदिबा, एल.एफ.आय. या संस्थेचे योगेश शिंदे, आकांक्षा फाउन्डेशनचे सुरेंद्र वाघमारे, सारथीचे गौरव पवार व हृषिकेश, पाय जामचे शुभम बडगुजर, आदिंची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत शिक्षण विभागातील विविध उपक्रमाबाबद माहिती देण्यात आली त्यात विविध एन.जी.ओ. बरोबरीची भागीदारी, सी. एस. आर. कमिटी, क्लार्क भरती, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम,एम.डी.एम.,मुख्याध्यापक कार्यशाळा, इंग्रजी भाषा शिक्षण,इंग्रजी विषय शिक्षकांची कार्यशाळा इत्यादींचा समावेश होता
उपस्थित सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना संबोधित करतांना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, तुम्ही जर आम्ही पाहत असलेल्या दृष्टीकोनातून आमच्या सोबत चाललात तर बदलाव व्हायला जास्त वेळ लागणार नाही. जोपर्यंत शिक्षक बदलाव करायचं ठरवणार नाहीत तो पर्यंत काही होणार नाही. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या पालकांना देखील सोबत घेऊन चालले पाहिजे, अकॅडमी सोबतच मुलांच्या स्वास्थ्याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाने अभ्यासा सोबत मैदानी खेळामध्ये देखील सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येक शाळेतील खेळात निपूण असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात येईल. प्रत्येकाला प्रशिक्षणाची गरज असते. येणाऱ्या काळामध्ये पिं. ची. मनापा मधील शाळेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये बदलाव करणार आहोत. एक दिवस असा आला पाहिजे की, शाळेत प्रवेश घ्यायच्या वेळी कॉर्पोरेशन शाळेबाहेर मुलांची रांग लागली पाहिजे, त्यादिवशी आपण काही प्रगती केली अस वाटेल. यानंतर शिक्षक आणि आयुक्तांचा प्रश्न उत्तरांचा मुक्त संवाद चालाला.
महापालिकेच्या उपक्रमांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सहभाग वाढवा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर स्मार्ट सारथी फीडबॅक ॲप बद्दल शिक्षकांना गौरव पवार आणि ऋषिकेश यांनी माहिती दिली. ज्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांना तक्रार नोंदणी करता येईल.