न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते अमित गोरखे यांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाली आहे.
याप्रसंगी उद्योजक विलास शिंदे यांनी अमित गोरखे यांची भेट घेतली. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक शितल शिंदे, तुषार हिंगे, देहूरोडचे संजय धुतडमल आदी मान्यवर उपस्थित होते.











