न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता चिंचवड येथील प्रिमियर कंपनीने आपला प्लांट १ मार्चपासून चाकणला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रिमियर कंपनीचे व्यवस्थापन कंपनीच्या कामगारांची पिळवणूक करीत आहे. कामगारांना आर्थिक विवंचनेत टाकून कंपनी व्यवस्थापन अन्यायकारक भूमिका घेत आहे.
कंपनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारी भूमिकेच्या विरोधात कामगारांनी गेल्या वर्षी ५४ दिवसांचे आंदोलन केले. तरीही, व्यवस्थापनाने त्याची दाखल घेतली नाही. कामगारांचे पीएफ, पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकलेले आहेत, असे प्रिमियर कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितले.











