न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ मार्च) :- लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावाची पहिली यादी १६ मार्च रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत उमेदवारांची नावं अंतिम केली जाणार आहेत.
भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानं भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. पहिल्या यादीमध्ये 17 उमेदवारांची नावं जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोलापूर, माढा, दिंडोरी, नांदेड, गडचिरोली-चिमूर आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे.











