न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ मार्च) :- मुंबईतील सीएसटी स्टेशन बाहेरील पादचारी पुल कोसळला.आता पर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मुख्य रस्त्यावर या पूलाचा स्लॅब कोसळल्याने रस्त्यावरील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
जखमी व मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सुमारे १५० वर्षां पूर्वीचा हा पूल आहे. पूल कोसळला या वेळी येथे मोठी वर्दळ होती.











