न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- संगणमताने https://profdg४८५ One या फसव्या वेबपेजच्या माध्यमातून फिर्यादीला ऑनलाईन टास्क कंम्प्लीट केल्यानंतर तात्काळ आकर्षक पैसे कमविण्याचा आरोपीने विश्वास दिला. फिर्यादीकडून एकूण २,८५,००० रुपये रक्कम फसवणूकीने प्राप्त करुन घेतली. त्यांना कोणताही परतावा न देता मूळ गुंतविलेली रक्कम स्वतःच्या फायदयाकरीता वापरून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३) पासून ते आजपर्यंत फिर्यादीच्या फ्लॅट नं.०४, विंग-सी, बारीकानगरी, कासारवाडी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी मो. क. ९८६२२७९८२९, ९३९०७३७०७८,८३४९२४०९०० चा वापरकर्ता इसम, टेलिग्राम आय डी @Asia १२१३८ आणि टेलिग्राम आय डी @Ahmad १९८२९९ चा वापरकर्ता इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २२९ / २०२३ भा.दं.वि. सह कलम ४०६,४०९, ४२०६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















