न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- हिंदीमध्ये ‘मै एमएसईबी इन्सपेक्टर राजकुमार यादव बात कर रहा हू, आपका एमएसईबी का बिल नही भरा है, आज रात ९.३० बजे आपका बिजली का कनेक्शन काट दिया जायगा ‘, असे आरोपीने फिर्यादीला फोनवरून सांगितले.
फिर्यादीला मोबाईलवर प्ले स्टोअरमधून एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यांची १५००० रुपये रक्कम ऑनलाईन मोबाईलव्दारे घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ९.३० वाजता फ्लॅट नंबर ४०२, ४ था मजला, ९ रामनगर, रामनगर कॉलनी, बावधन येथे राहत्या घरी घडला.
फिर्यादी सुहास रामचंद्र गगनग्रास (वय ६३ वर्षे, धंदा-रिटायर्ड, रा. फ्लॅट नंबर ४०२, ४ था मजला, ९ रामनगर, रामनगर कॉलनी, बावधन) यांनी आरोपी मोबाईल नंबर ९१२३८७८७१६ वरिल बोलणारा राजकुमार यादव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २५१/२०२३ भा.द.वि.कलम ४०६, ४२० व माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००८ चे कलम ६६ (क).६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















