न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- घरातुन येत असलेल्या लालसर रंगाच्या पाण्याचा फिर्यादीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने त्यांना तु माझी तक्रार घरमालकाकडे करतो का? असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सत्तुर फिर्यादीच्या डोक्यात तीन वेळा मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या त्यांच्या भावाच्या डोक्यात आरोपीने उजव्या बाजूने, कपाळालगत, उजव्या खांदयावर सत्तूरने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी रात्री ९.४५ वाजता आरोपीच्या घरासमोर गणपत लांडगे चाळ, सदगुरूनगर, भोसरी येथे घडली.
फिर्यादी चित्तरंजन शदर बेहरा (वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. गणपत लांडगे चाळ, सदगुरू नगर भोसरी; मुळगाव मजीपाडा, ता. बोंडम्बा, जि. कटक राज्य ओडीसा) यांनी आरोपी गणपत लांडगे चाळ, सदगुरूनगर भोसरी येथील फिर्यादीच्या घराशेजारील राहणारे जगताप कुटूंबीयातील त्यांचा तोड ओळखीचा इसम (नाव माहित नाही, वय अंदाजे ४५ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २३१/२०२३ भादवी कलम ३०७ भाहका कलम ४ (२५) मपोका कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















