न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- कुदळवाडी चिखलीतून (दि. १५) रोजी सकाळी ९.३० ते सायं ६.३० च्या दरम्यान भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे, केअर ऑफ विनायक धोंडीबा बालघरे यांचे खोलीत राहणारे १५ वर्षांचे दोन मुलं पळवून नेल्याची घटना घडली आहे.
फिर्यादीचा अपहृत बालक कु. आकाश कमलेश त्रिपाठी (वय १५ वर्षे ०६ महीने ०६ दिवस) उंची ५ फुट २ इंट रंग सावळा, नाक सरळ केस केस काळे लहान लहान चेहरा-गोल, अंगाने- मध्यम, अंगात चॉकलेटी रंगाचा सफेद रंगाची रेखा असलेला शर्ट पॅन्ट (कोणती घातली त्याबाबत माहीती नाही) पायात काळया रंगाची स्लिपर चप्पल, २५०० रुपये रोख रक्कम व जवळ बँकेचे एटिएम (कोणत्या बँकेचे आहे ते माहीती नाही) काळया रंगाची बॅग, हिंदी भाषा बोलनारा मुलगा आणि त्याच वयाचा अपहृत बालक गणेश चौधरी (पुर्णनाव व पत्ता माहीत नाही) या दोघांना कोणीतरी कशाचे अमिश दाखवून, त्यांचा अज्ञानतेचा फायदा घेवून, फुस लावून फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात इसमाने पळवून नेले आहे.
या प्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १७२ / २०२३ भादंवि कलम २६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.