न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- खराळवाडी येथील एका तरुणीचा मंगळवारी (दि. १४) रात्री येरवडा येथे एका इमारतीच्याखाली संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता.
तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या मित्राने खराळवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि. १७) रोजी दुपारी उघडकीस आली आहे.
जयेश रामदास मंगळवेढेकर (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर जयेश हा खूप अस्वस्थ होता. त्याने आत्महत्येचा या आधीही प्रयत्न केला होता. त्यांनतर त्याने आज गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.