न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- चिंचवड येथील अंडरपासमध्ये एक ट्रॅक्टर उभा होता. या ट्रॅक्टरला एक छोटा टेम्पो येऊन धडकला. त्यानंतर टेम्पोला आणखी एक मोटार धडकली. यात टेम्पोचालक जखमी झाला. वाहनांचेही नुकसान झाले.
अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. या अपघातामुळे आकुर्डीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुरुवारी याच ठिकाणी अंडरपासला ट्रक घासल्याने त्यातील माल रस्त्यावर पडला होता. त्यानंतर ट्रक चालक पसार झाल्याने तब्बल सहा तास ट्रक रस्त्यातच उभा होता. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवाशी खेळ होत आहे.