न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- फ्लॅटचा अर्धवट दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरात असणारे लेनोव्हा आणि एच पी १५ एस कोर आय ३ कंपनीचे ५५,००० रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप चोरी करून नेले आहेत.
ही घटना (दि. १४) रोजी सकाळी ११.०० ते सायं ५.५० च्या दरम्यान, दत्तात्रय हुद्देदार यांचेकडे भाडयाने सर्वे नं ७१, किर्तीनगर गल्ली नं २, हाऊस नं १६, फ्लॅट नं ५, नवी सांगवी येथे घडली.
फिर्यादी दत्ता माधवराव जाधव (वय २५ वर्षे, धंदा नोकरी, रा. नवी सांगवी) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात १०३ / २०२३, भा.दं.वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















