न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- भांडणाचा राग मनात धरला. फिर्यादी हे त्यांची पत्नी व भाऊ शंकर पवार, आजुबाजुचे लोक झोपडी बाहेर बोलत बसले होते. त्यावेळी फिर्यादीचा आरोपी भाचे जावई अचानक तिथे आला. फिर्यादीचा भाऊ शंकर पवार याच्या सोबत झालेल्या भांडणातून आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर उलटा कोयता मारुन पाय फ्रॅक्चर केला. पुन्हा कोयत्याने डाव्या हाताच्या अंगठ्याखाली तळ हातावर व उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटावर कोयता मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मोबाईल कोयता मारुन फोडुन नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १५) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास राहत्या झोपडी बाहेर बी.एस. एन.एल. ऑफीस शेजारी, गुजर गैस जवळ, एम.आय.डि.सी. भोसरी येथे घडला.
फिर्यादी सिताराम नागोराव पवार (वय ४० वर्षे, धंदा मजुरी, एमआयडिसी भोसरी) यांनी आरोपी राहुल बाळु पवार (वय अंदाजे ३० वर्षे, रा. बालेवाडी स्टेडियम जवळ, वाकड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ९७/२०२३ भा.दं.वि. कलम ३२६,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















