न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- मारुंजी गावातील स.नं. ४६/४/२, ३ आर जागेमध्ये (दि. २३/०२/२०२३) रात्री ११.०० च्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादीला शिवीगाळ करुन गॅस कटर व अज्ञात जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीच्या जागेत असलेले सिमेंट पोल व तारेचे कंपाऊंड तोडुन त्याचे नुकसान केले.
फिर्यादीच्या नावाचा बोर्ड व कंपाऊंडच्या तारा काढुन आरोपींनी चोरुन नेल्या. भगवानसिंग चित्तोडिया या नावाचा बोर्ड जागेमध्ये लावला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी किरण प्रकाश बुचडे (वय ३८ वर्षे, धंदा शेती व व्यवसाय, रा. मारुंजी) यांनी आरोपी भगवान सिंग चित्तोडिया, त्याची पत्नी, भाऊ व इतर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात २५६/२०२३ भा.दं.वि. कलम ४४७,३७९, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















