न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- पिंपळे सौदागर येथे रोडच्या कडेला अवैधरित्या विनापरवाना २५० रुपये किंमतीचा लोखंडी कोयता आरोपीने जवळ बाळगला. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने याप्रकरणी (दि. १७) रोजी दुपारी १.४० च्या दरम्यान कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून कोयता जप्त केला. सांगवी पोलीस ठाण्यात आरोपीवर १०४/२०२३ आर्म अॅक्ट ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक भगवान मोहिते (वय २१ वर्षे, रा. बिल्डींग नं २, विश्वशांती कॉलनी गावठाण, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















