न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील, जाधववाडी येथे घडली आहे.
विरेन जाधव (वय २७, रा. रिव्हर रेसिडेन्सी चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सर्व सुखसोयी असताना आयुष्यात आलेल्या नैराश्यामुळे सत्तावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उजेडात आली.
विरेण हा आई वडिलांसह चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सीत राहण्यास होता. तो नामांकीत कंपनीत नोकरी करत होता, चांगला पगार असताना आयुष्यात आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती प्राथमिक तपासानंतर चिखली पोलिसांनी दिली आहे.
















