- वाहकाला मारहाण; प्रवाशांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- तिघांनी पीएमपीएमएल प्रवासी बस (एमएच१४एचयु६२९७) सार्वजनिक रोडवर अडवून बसच्या डाव्या बाजुकडील खिडकीच्या २ काचा त्यासह आय २० कार (एमएच१२एलपी३६७६) ची पाठीमागील काच रस्त्यावरील दगड व हातातील स्टिलचे कडे यांनी फोडली. फिर्यादी व लोकसेवक वाहक यांना हाताने मारहाण करुन प्रवास करणारे प्रवासी यांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणुन जखमी करुन शिवीगाळ व धमकी देवुन वाहनाचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी दुपारी ४.०० वाजता ओंकार गार्डन चौक, सर्व्हिस रोड, सोनक टोयोटा शोरुम समोरील सार्वजनिक रोडवर, बावधन येथे घडली.
फिर्यादी योगेश निंबाजी बोरसे (वय ३१ वर्ष, व्यवसाय चालक, रा-रुपीनगर तळवडे गणेश मंदिरशेजारी, के ऑफ रविंद्र मोहिते रुपीनगर तळवडे) यांनी आरोपी रामा रेडडी मेघावत (वय २४ वर्ष रा. पाषाण अग्निशामकचे पाठीमागे, गल्ली नं-३२, संजय गांधी वसाहत लमाण तांडा, पाषाण, पुणे), अजय नेहरू राठोड (वय २२ वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर के परेड कुलाबा मुंबई), पवन आंबादास मगर (वय २२ वर्ष रा-गल्ली नं-१६ संजय गांधी वसाहत लमाण तांडा, पाषाण पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात २६६/२०२३ भा. दं. वि. कलम ३३२, ३३६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ क्रिमीनल लॉ. २०२ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.