न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार आज पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपवासी जेष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेतली.
या भेटीत काय घडले हे अजूनतरी गुलदस्त्यात असून, आजून युतीतच आहात ना? असा प्रश्नार्थक सवाल शरद पवार यांनी आझम पानसरे यांना केला असल्याचे सूत्रांकडून समजते. शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना पक्षाने मावळ लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पवारांचे सर्वस्व या मतदारसंघावर अवलंबून असून, त्यासाठी शहर व मावळात राष्ट्रवादीचे नेतेमंडळी तळ ठोकून आहेत.
कुठल्याही परीस्थितीत मावळ मारायचेच असा पवारांनी चंगच बांधला आहे. त्यामुळे या भेटीस महत्व आले असून, मागील काही दिवसांपूर्वीही अजित पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीचा अर्थही मावळशीच आहे, असा कयास बांधला जात आहे.











