न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज झाले. या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, मोहिते-पाटील, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदी उपस्थित होते.
मोहिते-पाटील यांनी यावेळी जोरदार बॅटींग केली. ते म्हणाले, “आम्ही रोहीत पवार यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. पण, आता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून द्यायचे आहे. आम्ही चिकना उमेदवार दिला आहे.”















