न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या वतीने भोसरी एमआयडीसी परिसरामधील रस्त्यालगतच्या अनधिकृत भंगार व्यावसायिक पत्राशेड, कंटेनर अशा १२ पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाने आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त २ जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या निर्देशनानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, बीट निरिक्षक योगेश शेवलकर, साधना ठोंबरे, शितल भोसले, रिता जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई केली.
भोसरी एम.आय.डी.सी. परिसरामधील रस्त्यालगतच्या अनधिकृत भंगार व्यावसायिक ७ पत्राशेड व ५ कंटेनरवर अशा १२ पत्राशेड / कंटेनरवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच ५ पत्राशेड हे संबधितांनी स्वत:हून काढून घेतली. एकूण १३५० चौ.फ़ुट अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड / बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आयुक्त यांच्या निर्देशनानुसार कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.